त्यांना येथील सत्र न्यायालयात उभे केले असता, दि. १६ पर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शनिवारी (दि. ६) कवठेमहांकाळ शहरातील थबडेवाडी चौकात अमर आटपाडकर याच्यावर पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला झाला होता. यामध्ये आटपाडकर गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती पाटील यास ताब्यात घेतले होते. बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आटपाडकरवर हल्ला केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याबरोबर आकाश कोळी यालाही अटक केली आहे. आणखी दोघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविली जात आहे. या घटनेचा तपास कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी करीत आहेत.