शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Sangli: पाडळीवाडी ओढ्याच्या पुरात दोघे दुचाकीस्वार वाहून गेले, प्रसंगावधानामुळे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 6:03 PM

शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून ...

शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून झाडास पकडून राहिल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे दाेघेही बचावले. शनिवारी रात्री ही घटना घडली.तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दमदार पाऊस झाला. निगडी-पाडळीवाडीदरम्यान असलेल्या ओढ्याला अचानक पाणी वाढले. दरम्यान, पाडळीवाडीचे बाबासाहेब काशीनाथ पाटील (वय ४५) व मारुती दादू पाटील (वय ४६) कामानिमित्त निगडी येथे आले होते. पावसाचा जोर वाढल्याने, त्यांना गावातच थांबावे लागले. रात्री दहा वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने दोघे दुचाकीवरून पाडळीवाडीस परतत हाेते. यावेळी ओढ्याचे पाणी पुलावरून जात होते. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दाेघेही क्षणात दुचाकीसह ओढ्यात वाहून गेले. बाबासाहेब पाटील यांना पोहता येत होते. तीनशे फूट वाहत गेल्यावर झाडाच्या फांदीचा आधार घेत ते कसेबसे पाण्याबाहेर पडले. शेतातून वाट शोधत ते ओढ्यापासून शंभर फुटावर सुनंदा साळुंखे यांच्या घरात आले. साळुंखे कुटुंबास आपला मित्र पाण्यात वाहून गेल्याचे सांगून गावातील लाेकांना मदतीसाठी बाेलावण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सुनंदा साळुंखे, त्यांचा मुलगा अनिकेत यांनी गावातील लोकांसह व पशुवैद्यक डॉ. दीपक पाटील यांना घटनेची माहिती दिली.अंधारात बॅटरीच्या उजेड पाडत मारुती पाटील यांचा शोध सुरू केला. घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर ते झाडाला पकडून थांबल्याचे दिसून आले. तरुणांनी पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले. रविवारी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकीही सापडली.

साळुंखे कुटुंबाचे प्रसंगावधानशनिवारी रात्री पुलावरून पाणी जात हाेतेे. पाण्याचा मोठा प्रवाह आहे, हे लक्षात आल्यानंतर जवळच राहत असलेल्या साळुंखे कुटुंबीयांनी रस्त्यावर बैलगाडी आडवी लावली. मोठा पाऊस असतानाही सुनंदा साळुंखे यांनी घरासमोर उभे राहून, दूध गाड्यांसह अनेक चारचाकी व दुचाकी वाहने परत पाठवली. त्यामुळे माेठी दुर्घटना टळली.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेfloodपूर