जत : अचकनहळ्ळी (ता. जत) येथील दाेघा भावांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी दाेघांनाही सुमारे १२ दिवस कोंडून ठेवून ४१ लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची फिर्याद सुनील गणपती बंडगर यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात कर्नाटकातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मण करपे व बुदू करपे (रा. कुन्नूर, कर्नाटक) या दोघांनी सुनील बंडगर यांचा मुलगा धानाप्पा सुनील बंडगर (वय २१) याचे अपहरण करून १६ लाखांची मागणी केली हाेती. यानंतर आंदू खरात (रा. लिबाळवाडा, कर्नाटक) याने १९ ऑक्टोबर रोजी बंडगर यांच्या दुसऱ्या मुलाचेही अपहरण करीत आणखी २५ लाखांची मागणी केली.याप्रकरणी सुनील बंडगर यांनी जत पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली. अपहृत मुलांचा शोध घेण्यासाठी जत पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
Sangli: अचकनहळ्ळी येथील दोघा भावांचे खंडणीसाठी अपहरण, ४१ लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:42 AM