शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

Accident in Sangli: टाकळीत दोन मोटारींचा भीषण अपघात, 'एअर बॅग'मुळे सहाजणांचे जीव वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 5:24 PM

अपघातस्थळी रस्त्याकडेला असलेल्या पानपट्टीत मोटार घुसल्याने पानपट्टीचा चुराडा झाला. काही सेकंदच अगोदर पानपट्टीचालक बाहेर गेला होता. पानटपरीचे मोठे नुकसान झाले तरी नशीब बलवत्तर असल्याने पानपट्टी चालक बचावला.

मिरज- टाकळी : मिरज-सलगरे मार्गावरील टाकळी चौकात शुक्रवारी दुपारी दोन वाजता दोन मोटारींच्या भीषण अपघातात चालकासह तिघे जखमी झाले. दोन्ही मोटारीतील एअर बॅग ऐनवेळी उघडल्याने सहा जणांचे प्राण वाचले. जखमी तिघांना मिरजेत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिरजेतून टाकळी मार्गे (एमएच-११-सीक्यु-९७७०) ही मोटार तासगावकडे जात होती. याचवेळी म्हैसाळच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी (एमएच-१२-केवाय-५८११) या मोटारीने टाकळी चौकात तासगावकडे जाणाऱ्या मोटारीला जोरदार ठोकर दिली. त्यामुळे तासगावकडे जाणारी मोटार रस्त्याकडेच्या पानटपरीत घुसली. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले. दोन्ही मोटारीतील एअरबॅग ऐनवेळी उघडल्याने सहा जणांचा जीव वाचला.एका मोटारीतील दोन वृद्धांसह चालक किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली .

पानपट्टी चालकाचे नशीब बलवत्तर

अपघातस्थळी रस्त्याकडेला असलेल्या पानपट्टीत मोटार घुसल्याने पानपट्टीचा चुराडा झाला. काही सेकंदच अगोदर पानपट्टीचालक बाहेर गेला होता. पानटपरीचे मोठे नुकसान झाले तरी नशीब बलवत्तर असल्याने पानपट्टी चालक बचावला. यापूर्वीही याच चौकात अशाच पद्धतीने अपघात झाले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात