मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत गावातील मृतांची संख्या ८ झाली आहे. वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक २७५ कोरोना रुग्ण कामेरीत आहेत.
सध्या कामेरीत ११८ ॲटिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यापैकी १०० पेक्षा जास्त रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. एकाच कुटुंबातील २ ते ५ रुग्ण बाधित झाले आहेत. ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेत क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहे. तिथे ८ स्त्री व पुरुष आहेत. भैरवदेव पतसंसस्थेचे संस्थापक सुनील पाटील व माजी सरपंच अशोक कुंभार यांच्याकडून त्यांना दोनवेळचे जेवण मोफत दिले जात आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समितीने सक्तीने प्राथमिक शाळेत इन्स्टिट्यूट क्वांरटाइन करून त्यांच्यावर उपचार करावेत, अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदूकाका पाटील व पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. तर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच केशव पाटील, ग्रामविस्तार अधिकारी आनंदराव पवार, तलाठी आर. बी. शिंदे, डॉ. नितीन चिवटे, संग्राम पाटील, दिनेश जाधव, बंडाकाका पाटील, योगेश पाटील व कोरोना आपत्कालीन दक्षता समिती प्रयत्न करीत आहे.