सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांना तडीपार करण्याचे आदेश दिले. यात तासगाव येथील प्रमोद उगारे टोळी व जतच्या विकास बनपट्टे टोळीचा समावेश आहे. दोन्ही टोळीतील प्रत्येकी तीन गुन्हेगारांना सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले.तासगावच्या उगारे टोळीतील टोळीप्रमुख प्रमोद उगारे, प्रमोद माने व विशाल उनउने (सर्व रा. सावळज, ता. तासगाव) या तिघांना तडीपार करण्यात आले. या टोळीविरूद्ध खूनाचा प्रयत्न, अवैध वाळू तस्करी, मारामारीसह ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.जतच्या बनपट्टे टोळीचा प्रमुख विकास बनपट्टे, आकाश बनपट्टे व सागर पाथरुट या तिघांवर खूनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही टोळीवर तडीपारीची ही कारवाई केली आली.
सांगली जिल्ह्यातील दोन टोळ्या तडीपार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षकांची कारवाई
By शीतल पाटील | Published: August 29, 2022 4:58 PM