सांगली : गुन्ह्यांचा तातडीने तपास आणि पोलिस कामकाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. संजय तुळशीराम संकपाळ आणि मुदस्सर अब्दुलकय्यूम पाथरवट असे पदक जाहीर झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली.पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली. त्यात जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.संजय संकपाळ यांनी मिरज शहर, सांगली शहर, विश्रामबाग, कवठेमहांकाळ आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केले असून सध्या ते पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. तर पाथरवट यांनी इस्लामपूर, विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, संजयनगर येथे काम केले असून सध्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात ते कार्यरत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दोघांचेही अभिनंदन केले.
सांगली जिल्ह्यातील दोन पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By शरद जाधव | Published: April 26, 2023 7:01 PM