संख : जत येथे विशाल विठ्ठल बामणे (वय २३, रा. विठ्ठलनगर, जत) या दुचाकी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून जत पोलिसांनी साडेचार लाखांच्या पाच दुचाकी जप्त केल्या.
जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी जत शहरात पेट्रोलिंग करून संशयिताना ताब्यात घेण्याचा आदेश दिला होता.
प्रवीण पाटील, केरवा चव्हाण, संतोष कुंभार जत शहरात रविवारी गस्त घालताना शेगाव चौक येथे विशाल बामणे संशयितरीत्या फिरताना आढळून आला.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने यापूर्वी पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले.
त्याच्याकडून चोरलेल्या पाच दुचाकी ताब्यात घेतल्या. त्याला अटक करण्यात आली.
दुचाकी किंवा इतर वाहन खरेदी करताना नागरिकांनी विकणाऱ्याकडून गाडीचे कागदपत्र त्याचा पॅनकार्ड, आधार कार्ड तपासावे. तो ओळखीचा असेल तरच अशा प्रकारचा व्यवहार करावा. वाहन विक्रीसाठी अनोळखी आल्यास त्याबाबत तत्काळ पोलिसांना कळवावेे, असे आवाहन जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी केले आहे.
फोटो ओळ : जत येथे संशयित विशाल बामणे याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या. सोबत पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, प्रवीण पाटील, केरुबा चव्हाण, सतीश माने, संतोष कुंभार उपस्थित होते.