शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

By admin | Published: May 09, 2017 11:39 PM

दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहात प्रसुती झालेल्या एका महिलेची हेळसांड केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी निलंबित केलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांवरील कारवाई मंगळवारी स्थायी समिती सभेत रद्दबातल ठरविण्यात आली. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेत, त्यांच्या बदलीवर मात्र शिक्कामोर्तब केले. जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आधी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहात एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. पण या महिलेवर उपचार करण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी विलंब केला. त्यात डॉक्टर जान्हवी दोरकर या उशिरा रुग्णालयात दाखल झाल्या. तोपर्यंत गर्भाशयातील बाळाने पोटात शौच केल्याने डॉक्टरांनी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण रुग्णवाहिकेसोबत कोण जाणार, यावरून प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांत वाद झाला. रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला नेत असताना काँग्रेस भवनजवळ रुग्णवाहिकेतच तिची प्रसुती झाली. याबाबत प्रसारमाध्यमातून वृत्त प्रसिध्द होताच आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी चौकशीचे आदेश दिले. आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी याप्रकरणी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला होता. अहवालातही डॉ. कवठेकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जान्हवी दोरकर, सफाई कर्मचारी पूनम गोवर, इनचार्ज सिस्टर मीना लोंढे यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यानुसार आयुक्तांनी डॉ. दोरकर यांना कार्यमुक्त केले, तर गोवर व लोंढे या दोघांना निलंबित केले होते. या कारवाईविरूद्ध गोवर व लोंढे यांनी स्थायी समितीकडे अपील केले होते. त्यावर मंगळवारी सभेत चर्चा झाली. गोवर व लोंढे यांचे निलंबन मागे घेण्यात आले, तर त्यांच्या बदलीची कारवाई मात्र कायम ठेवली.सभेत पावसाळी मुरूमावर चर्चा झाली. बसवेश्वर सातपुते यांनी, मुरूम कधी देणार आहात?, असा सवाल करीत, आयुक्तांचा पावसाळ्यात मुरूम टाकण्यास विरोध आहे. त्यात पाऊस झाल्यास वाहने उपनगरात जात नाहीत. मग नागरिकांना कधी मुरूम मिळणार?, असा जाब विचारला. त्यावर उपायुक्तांनी, आवश्यक ठिकाणी मुरूम टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. स्ट्रिट लाईट साहित्य खरेदीच्या ३० लाख रुपयांच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली. नालेसफाईचे कामही आठ दिवसात सुरू करण्याची सूचना सभापती हारगे यांनी प्रशासनाला दिली.