सांगली : येथील पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे याचा खून केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय व विधी विभाग कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली होती.
या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे जंगलात नेऊन जाळला होता. तसेच अनिकेत व अमोल पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचला होता.कोथळे खूनप्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय व विधी विभाग कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली.७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी ८ नोव्हेंबरला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीचे पथक करीत आहे.