शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

कुणीकोणूर दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश, आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 9:03 PM

ही घटना रविवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता  बेळंखी वस्तीवर घडली.

गजानन पाटील

दरीबडची : कुणीकोणुर (ता.जत) येथील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले.हा खून भानामती, करणी,भावकीचा वाद या कारणाने हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियंका बिराप्पा बेंळुखे (वय-३२) व मुलगी मोहिनी बिराप्पा बेंळुखे (वय-१४) या मायलेकीचे नांव आहेत. या आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ही घटना रविवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता  बेळंखी वस्तीवर घडली.अक्षय रामदास बेळुंखे (वय २४),विकास मारुती बेळुंखे (वय २३), यांना अटक करण्यात आली. फरारी बबलू म्हळाप्पा बेळुंखे (वय २३) आहे.पोलिस शोध घेत आहेत.ही घटना रविवारी सायंकाळी रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली होती.

दुहेरी हत्याकांडाने खळबळ निर्माण झाली होती.कुणीकोणूर-सनमडी रस्त्यालगत बेळंखी वस्तीवर पति बिराप्पा कुटुंबासह रहातात.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी,अन्य दोन मुले आहेत.बिराप्पाचे भावकीबरोबर वाद होता.पत्नी प्रियंका ही भानामती,चेटणी, करणी करते.त्यामुळे अक्षयाचा मोठा भाऊ भावकीतील माजी सैनिक विजयकुमार बेळुंखे यांचा एका महिन्यापूर्वी निधन झाले होते.आरोपी अक्षय यांचा मोठ्या भाऊ माजी सैनिक विजयकुमार बेळुंखे यांचा एका महिन्यापूर्वी निधन झाले होते.त्याबरोबर त्यांचे पूर्ववैमनस्य होते.

रविवारी सायंकाळी पाच वाजता घरी कोणीही नव्हते.अक्षय बेळुंखे ,विकास बेळुंखे  बबलू बेळुंखे हे घरी गेले. प्रियंकाला पाणी मागितले. पाणी आणायला आत गेल्यावर दोघांनी तिला दोघांनी पकडले.तिस-यांनी गळा दाबून खून केला.मुलगी मोहिनी ही पाणी आणायला गेली.तिने आईचा मृतदेह आरोपी आईचा मृतदेह छप्परात टाकताना मोहिनीने बघतिला.ती आरडोआरडो करु लागली.घटना पाहिल्यामुळे तिची बाहेर वाचता करेल. या भितीने मुलगी मोहिनी हिचा गळा आवळून तिचा खून केला.तेथून ते विकास,बबलू फरार झाला. सांगोल्याला दुचाकी गाडीवरुन गेले.सांगोल्यातून रेल्वेने दिल्र्लीला गेले. संशयित म्हणून अक्षयला ताब्यात घेतले होते.परंतु गुन्हा कबूल न केल्यामुळे सोडले होते. आज सकाळी विकास सापढल्याने गुन्हा उघडकीस आला.पोलिस फरार बबलू याचा शोध घेत आहेत.

पति पत्नी वारंवार खटके उडत होते.हा खून त्याच्याव येईल.यामुळे खून करुन आरोपी करुन फरारी झाला ही घटना संशयास्पद असल्याने रात्री १० वाजता माहिती पोलीस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्याला दिली.फिर्यादी मयतचा भाऊ संतोष रामा चौगुले (वय १९,रा खैराव ता.जत) यांनी दिली आहे.त्यानुसार बिराप्पा बेळुंखेला अटक केली होती.तात्काळ उमदी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी मयतचा भाऊ संतोष रामा चौगुले (वय १९,रा खैराव ता.जत) यांनी दिली आहे.त्यानुसार बिराप्पा बेळुंखेला अटक केली होती. मुलगी मोहिनी ही गावातील हुडेबाबा हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत आहे. बिराप्पाचे लग्नानंतर सुखात संसार सुरु होता.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी हिचा खून झाला.या दुहेरी खूनामुळे तीन कुटुंब उध्वस्त झाले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस फौजदार महेश स्वामी यांना गुप्त माहिती मिळाल्याने.सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,पोलीस उपनिरीक्षक एस एस शिंदे,हवालदार संजयकुमार माळी,महेश स्वामी,पोलीस हवालदार आटपाडकर,पोलीस सिध्देश्वर हवालदार नितीन पलूस्कर,पोलीस हवालदार प्रकाश रामागडे,पोलीस शिपाई आप्पा कुंभारे यांनी सापळा रचून दोघांना अटक केले आहे.