सांगली : अनाथ, निराधार, निराश्रीत, उन्मार्गी व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेकांस आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष न्यायाधीश शितल केस्तीकर यांनी केले.कै. दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह सांगली येथे चाचा नेहरू बाल महोत्सव 2019-20 कार्यक्रमाचे उद्घाटन बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष शितल केस्तीकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. एस. एम. पखाली, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सुचेता मलवाडे, सदस्य ॲड. शोभा पाटील, प्रा. उदयराव जगदाळे, आ. बा. पाटील आदि उपस्थित होते.न्यायाधीश शितल केस्तीकर म्हणाल्या, मुलांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवासारखे कार्यक्रम आवश्यक आहेत. प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही कलागुण असतात. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांनी त्यांच्यातील कलात्मक गुण, कौशल्य दाखवून द्यावे असे आवाहन करून त्यांनी मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार म्हणाल्या, महिला व बाल विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय / स्वयंसेवी संस्थांमधील अनाथ, निराधार व निराश्रीत मुला मुलींसाठी जिल्हास्तरावर बालदिन निमित्ताने बाल महोत्सव साजरा करण्यात येतो. संस्थेतील प्रवेशितांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षीचा बालमहोत्सव दिनांक ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.या बाल महोत्सवामध्ये खोखो, कबड्डी, १०० मी. धावणे, रिले (४७१००), लिंबू चमचा, पोत्यांची शर्यत, कॅरम, बुध्दिबळ, हस्ताक्षर, निबंधलेखन, चित्रकला, रंगभरण, सामुहिक नृत्य, वैयक्तिक गीत, वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय मुलींचे कनिष्ठ /वरिष्ठ बालगृह मिरज, कै. दादूकाका भिडे मुलांचे बालगृह/निरीक्षणगृह, सुंदराबाई शंकरराल मालू मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह सांगली, वेलणकर बालगृह क्र.१ व क्र. २ सांगली, पाठक बालगृह मिरज, भगिनी निवेदिता मुलींचे बालगृह यशवंतनगर, सांगली, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृह यशवंतनगर, सांगली, भारतीय समाज सेवा केंद्र (कर्ण) लहान मुला-मुलींचे बालगृह सांगली, भगिनी निवेदिता मुलींचे बालगृह जत, प्रभाततारा संस्था संचलित मुलींचे बालगृह बामणोली, पाखर संकुल मुलांचे बालगृह निगडी बुद्रुक या बाल महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत.प्रारंभी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व बालगृह संस्थेचे अधिक्षक, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, बालगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त : शितल केस्तीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 1:35 PM
अनाथ, निराधार, निराश्रीत, उन्मार्गी व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेकांस आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष न्यायाधीश शितल केस्तीकर यांनी केले.
ठळक मुद्देचाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त : शितल केस्तीकरकै. दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षणगृह-बालगृह सांगली येथे महोत्सव