शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

कडकनाथ प्रकरणात मौनामागं दडलंय अंडरस्टँडिंग ---- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:34 PM

राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?

ठळक मुद्दे- कारण राजकारण --राजकीय सोय आणि जिरवाजिरवी

श्रीनिवास नागे -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कडकनाथ कोंबडीपालन फसवणुकीचं प्रकरण चव्हाट्यावर आलं. या प्रकरणाचं केंद्र इस्लामपुरातच. संशयाची सुई काही राजकीय मंडळींकडं फिरत असलेली. रान पेटवण्यासाठी हे आयतं कोलीत... पण ‘अंडरस्टँडिंग’च्या खेळात सर्वच नेतेमंडळी मूग गिळून गप्प! भाजप-शिवसेनेवर तोफा डागणारे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा हा स्वत:चा मतदारसंघ असूनही ते बोलत नाहीत. एवढा ज्वलंत प्रश्न उचलण्याची, विरोधकांवर हल्ला चढवण्याची नामी संधी असताना त्यांनी या विषयावर अवाक्षरही काढलेलं नाही... यामागचं इंगित काय?‘कडकनाथ’ प्रकरण बाहेर येऊन महिना होत आला. आठ हजारावर गुंतवणूकदारांना तब्बल साडेपाचशे कोटीचा चुना लावला गेला. त्याची सर्वांत मोठी झळ वाळवा तालुक्याला बसल्याचं उघड होतंय. त्यात गरीब शेतकरी, बेरोजगार तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक नागवले गेले. खाद्य-औषधांअभावी पोल्ट्री शेडमधल्या कोंबड्यांची तडफड सुरू झालीय. पोलिसांचा तपास सुरू आहे, केवळ सांगण्यापुरताच! गुंतवणूकदार हवालदिल झालेत. पण तिथली राजकीय मंडळी गप्प आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय म्हणे. तेवढं सोडलं तर हे प्रकरण धसास लावण्यासाठी, ना सत्ताधारी पक्ष प्रयत्न करताहेत, ना विरोधक आक्रमक झालेत.दबावातून लादलेली अपरिहार्यता, राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?गेल्या वर्षभरापासून जयंतरावांचे विरोधक शड्डू ठोकताहेत. आखाडा एकच असला तरी सराव मात्र वेगवेगळ्या तालमीत. कुणी लांग बांधतंय, तर कुणी अंगाला तेल लावतंय, कुणी जोरबैठका काढतंय, कुणी वस्तादांच्या नुसतंच कानाला लागतंय, तर कुणी कुस्तीला जोड आपलीच ठरलीय म्हणून सांगतंय. मग जयंतरावांना त्याबाबत विचारलं जातं... ते हसतात आणि विरोधकांना बेदखल करण्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतात, ‘त्यांचा पैलवान तर ठरू दे!’ तेव्हापासून विरोधकांचा पैलवान अजून ठरतोय. लढत पंचवीस दिवसांवर आली तरी रिंगणात कुणी उतरायचं हेच स्पष्ट नाही. त्यातच विरोधकांतील फाटाफूटही चव्हाट्यावर आलीय. हेच जयंतरावांच्या पथ्यावर पडतं. विधानसभेच्या लागोपाठ सहा लढती त्यांनी याच जोरावर एकहाती मारल्यात. तत्पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी करावे लागणारे सगळे प्रयत्न ते करतात... अगदी इमानेइतबारे!राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जयंतरावांच्या गटाचे काही मोहरे भाजप-सेनेच्या तंबूत गेले. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील, वैभव शिंदे, भीमराव माने, स्वरूपराव पाटील त्यातलेच. इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचं मैदान मारल्यापासून निशिकांतदादांना आमदारकी खुणावायला लागलेली.

भाजपनं जिल्ह्यातल्या सत्तास्थानांवर कब्जा केल्यामुळं आणि सत्तेचं पाठबळ मिळाल्यामुळं सदाभाऊ खोत यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधलेलं. त्यातूनच दोघांचं फाटलं. दोघांनी आपापली तयारी सुरू केली, पण गेल्या दीड महिन्यात सदाभाऊंचं नाव मागं पडलं. कारण कडकनाथप्रकरणी विरोधकांनी त्यांच्याकडं संशयाची सुई वळवली. त्यांनी त्याचा इन्कार केला, पण संशयाचं मोहोळ हटलं नाही, परिणामी तिकिटाच्या शर्यतीतला पत्ता ‘कट’ झाला.

निशिकांतदादांनी मतदारसंघात स्वत:चा गट बांधलाय. संपर्क वाढवलाय, पण सदाभाऊंनी निशिकांतदादा सोडून इतरांना एकत्र केलंय, जयंतरावांविरोधात! त्यात नायकवडींचे हुतात्मा संकुल, महाडिक बंधू, वैभव शिंदे, भीमराव माने, सी. बी. पाटील गट, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार सामील झालेत. गौरव नायकवडी किंवा आनंदराव पवार यापैकी एकाला तिकीट द्या (पण निशिकांतदादांना नको!) हा त्यांचा हेका. बैठकांना बोलावलं जातं की माहीत नाही, पण त्यांच्या बैठकांमध्ये निशिकांतदादा दिसत नाहीत.

एका बाजूला सदाभाऊंनी जमवलेले विरोधक, तर दुसऱ्या बाजूला निशिकांतदादांसोबत माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील. दोन्ही गट जयंतरावांपेक्षा एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानणारे. आता एकाला तिकीट मिळालं की दुसरा गनिमाला जाऊन मिळालाच म्हणून समजा! सांगा, फायदा कुणाला?

जाता-जाता :कडकनाथप्रकरणी जयंतरावांना विचारलं, तर ते सांगतात, ‘माहिती घेतोय’. राज्याची जबाबदारी असल्यानं बहुधा त्यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रश्नही समजून घेण्यास वेळ मिळाला नसावा! खरं तर ‘आधी मतदारसंघ, मग बाकीचं राजकारण’, हे त्यांचं सुरुवातीपासूनचं सूत्र. पंधरा वर्षं मंत्री असतानाही त्यांची मतदारसंघावर घारीसारखी नजर असायची. कडकनाथ प्रकरणात मात्र जरा कानाडोळा झाला. किती ही व्यस्तता! की अंडरस्टँडिंग? तिरकस बेरजेच्या राजकारणात हातचा राखणं यालाच म्हणायचं.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक