ठळक मुद्देसांगलीत परीट समाजातर्फे कपडे धुण्याचे अनोखे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी
सांगली : परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी सांगलीत परीट समाज सेवा संघाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.डॉक्टर बांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठवावा, संत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, संत गाडगेबाबा यांचा 23 फेब्रुवारी हा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून साजरा करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.