शेगाव : शेगाव (ता. शेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता महादेव माने यांची, तर उपसरपंचपदी सचिन हनुमंत बोराडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मंडल अधिकारी भारत काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
माजी सरपंच लक्ष्मणराव बोराडे म्हणाले की, शेगावच्या जनतेने गावात विकासकामांसाठी व शांततेसाठी भाजप-राष्ट्रवादीच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला भरघोस मते देऊन १३ पैकी १२ उमेदवारांना विजयी केले.
उपसरपंच सचिन बोराडे म्हणाले की, शेगावच्या जनतेने आमच्या पॅनेलला भरभरून मते देऊन आमच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास गतीने करणार आहोत.
यावेळी दादा पाटील, वसंत शिंदे, वसंत काशीद, बबलू शिंदे, मल्लिकार्जुन नाईक, हौसाबाई तुळशीराम नलवडे, दत्तात्रय व्हनमाने, कृष्णदेव बुरुटे, विष्णू शिंदे, शिवाजी माने, सतीश नाईक, शीतल व्हनमाने, काजल बुरुटे, स्वाती सावंत, तलाठी अनिल हिप्परकर, ग्रामसेविका कल्पना गवळी, लिपिक सुभाष निकम, आदी उपस्थित होते.
फोटो- १७ सुनीता शिंदे,
१७सचिन बोराडे