शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:24 AM

सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी साडेअकरानंतर तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा आणि ...

सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी साडेअकरानंतर तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा आणि खानापूर तालुक्यात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. सकाळी वायफळे, आरवडे येथे पाऊस झाला. कडेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून, नेवरी परिसरात पावसाने हजेरी लावली. वाळवा तालुक्यातील बोरगाव, ताकारी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, मसुचीवाडी, वाळवा आणि बागणी परिसरात रिमझिम पाऊस पडला. परिणामी परिसरातील ऊसतोडी ठप्प झाल्या. पलूस तालुक्यातील पुणदी, नागराळे परिसरातही पावसाने हजेरी लावल्यामुळे ऊसतोडी थांबल्या. दुधोंडी येथेही तुरळक सरी पडल्या.

अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेला द्राक्ष हंगाम अडचणीत आला आहे. घडामध्ये पाणी साचल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी तयार केली जाणारी द्राक्षे मणी तडकल्याने नुकसानीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीचेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष मण्यातील तयार साखर कमी होण्याची भीती बागायतदार महादेव पाटील यांनी व्यक्त केली.