शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

..अखेर तिने ‘पीएसआय’चे स्वप्न केलं साकार, सांगलीच्या उर्मिला खोत यांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 7:20 PM

मुलीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद उर्मिलाच्या आई-वडिलांना झाला. दीक्षांत समारंभात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते.

सांगली : वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीच्या महिला कॉन्स्टेबलने प्रयत्नांची पाराकाष्टा केली. चार वेळा अपयश येऊनही पाचव्यांदा पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला. केवळ हे पदच नव्हे तर प्रशिक्षणादरम्यान त्यांनी दोन पुरस्कार मिळवून राज्यभरातून आलेल्या महिलांमध्ये अव्वल कामगिरी करुन दाखविली.सांगलीच्या उर्मिला महेश कांबळे (भोई) म्हणजेच पूर्वाश्रमीच्या उर्मिला जालिंदर खोत या २००३ मध्ये सांगली पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. २००४ मध्ये त्यांचा विवाह जिम प्रशिक्षक महेश कांबळे यांच्याशी झाला. उर्मिला यांचे वडिल काही काळ लष्करात व त्यानंतर पोलीस दलात होते. आजोबाही लष्करात हाेते. आपल्या मुलीने कर्मचारी नव्हे तर पोलीस अधिकारी व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती.त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी उर्मिला यांनी २०११ पासून खात्यांतर्गत परीक्षा देण्यास सुरुवात केली. बाहेरुनही त्यांनी परीक्षा दिली, मात्र त्याठिकाणी थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. चार परिक्षांमध्ये अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांबरोबर त्यांचेही स्वप्न न्यायिक प्रक्रियेत अडकले. अखेर जेव्हा हा वाद मिटला तेव्हा त्यांचे नाव यादीत आले आणि त्यांना प्रशिक्षणासाठी नाशिकला निमंत्रित करण्यात आले.बेस्ट ऑल राऊंडर वुमन कॅडेट इन द बॅच’चा किताबनऊ महिन्यांच्या मैदानी, लेखी परीक्षेसह फायरिंगमध्ये त्यांनी महिलांत अव्वल स्थान पटकावले. याठिकाणी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार तसेच बेस्ट ऑल राऊंडर वुमन कॅडेट इन द बॅच’चा किताब मिळाला. नाशिकमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीत त्यांनी पोलीस मुख्यालयातील विविध शाखा, मिरज शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी १८ वर्षे नाेकरी केली आहे. उर्मिला यांनी सांगितले की, माझ्या यशात आई-वडिलांसह पती व मुलगीचेही योगदान आहे.आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रूमुलीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद उर्मिलाच्या आई-वडिलांना झाला. दीक्षांत समारंभात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस