शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
3
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
4
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
5
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
6
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
7
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
8
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
9
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
10
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
11
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
12
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
13
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
14
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
15
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
16
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
17
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
18
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
19
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
20
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

चार प्रभागांत रिक्षा घंटागाडीचा प्रयोग

By admin | Published: June 15, 2017 10:58 PM

चार प्रभागांत रिक्षा घंटागाडीचा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चार प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर रिक्षा घंटागाडी सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर नवी मुंबई, पुणे, नाशिक महापालिकांच्या प्रकल्पांच्या पाहणीसाठी तीन दिवसांचा दौरा करण्यावर यावेळी शिक्कामोर्तब झाले. महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा प्रकल्पाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर विजय घाडगे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, नगरसेवक शेखर माने, रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, प्रशांत मजलेकर, संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, निर्मला जगदाळे, मृणाल पाटील उपस्थित होते.या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर चार प्रभागात ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अतिरिक्त कर्मचारी, घंटागाड्यांची संख्या वाढविणे, कंटेनरची संख्या यावर चर्चा झाली. नागरी वस्तीपासून दूर असणाऱ्या खुल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी घरा-घरातून गोळा होणारा कचरा टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी कचरा वर्गीकरण करून खत निर्मितीसाठी सुका कचरा थेट कचरा डेपोवर नेता येईल. घरा-घरातला कचरा उचलण्यासाठी डस्टबिन देण्यात यावे, यासाठी सदस्यांच्या स्थानिक विकास निधीतून हे कचरा डबे देण्याचा निर्णय झाला. या बैठकीत दोन प्रभागात खासगी एजन्सीमार्फत दोन घंटागाड्या आणि दोन प्रभागात महापालिका पातळीवर दोन रिक्षा घंटागाड्या सुरु करण्याबाबत एकमत झाले.यात खर्च जास्त कशासाठी येतो, याचा अंदाज घेऊन पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. कचरा उठाव, वाहने, चालक यांचा प्रायोगिक तत्त्वावर ठेका देण्यासंबंधीही चर्चा झाली. महापालिकेमार्फत हे चालवले तर किती खर्च येईल आणि खासगी एजन्सीमार्फत चालवले तर किती खर्च येईल, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्त सुनील पवार यांना दिले. सदस्य शेखर माने यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरा उठावाचे उद्दिष्ट द्या, असे सुचवले. राज्यात नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणी घनकचरा प्रकल्प सुरु आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी दि. २८, २९ आणि ३० जून रोजी दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा वर्गीकरणाच्या कामास तयारीघनकचरा बैठकीसाठी हिंंद मजदूर सभेच्या कचरा वेचणाऱ्या महिलांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांनी कचरा डेपोवर कचरा वर्गीकरण करण्याचे काम करायला तयार असल्याचे सांगितले. या महिलांना याबदल्यात मोबदला द्यायचा की वर्गीकरण केलेला कचरा द्यायचा, याबाबतचा निर्णय आरोग्य अधिकाऱ्यांना घेण्याचे आदेश दिले. यासंदर्भात दोन दिवसात कचरा वेचक महिला प्रतिनिधींबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.