शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

Sangli: शेतीच्या युरियाचा इंडस्ट्रीजसाठी वापर, कडेगावमध्ये ३८ लाखांचा युरिया जप्त

By अशोक डोंबाळे | Published: March 23, 2024 6:30 PM

कृषी विभागाकडून बोगसगिरीचा भांडाफोड  

सांगली : शेती वापरासाठीचा युरिया इंडस्ट्रीज वापरासाठीच्या बॅगमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्याचा कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी कडेगावमध्ये भांडाफोड केला. संबंधीतांकडून शेती वापराचा २१० टन युरिया जप्त केला आहे. या युरियाची ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपये किंमत असून गोदाम व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा. आटके, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.कडेगाव एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ए ३८ मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये खत नियंत्रण निरीक्षक राहुल बिरनाळे, कडेगावचे तालुका कृषी अधिकारी बुकेश्वर प्रकाश घोडगे, पोलिस उपनिरीक्षक यू. आर. काळे यांनी शुक्रवारी छापा टाकून तपासणी केली. यावेळी शेती वापरासाठीच्या युरियाचा साठा गोदामात आढळून आला. आर. सी. एफ, सरदार, मद्रास फर्टीलायझर, इफकोई कंपनींच्या युरियाच्या बॅगा सापडल्या आहेत. इंडस्ट्रीज वापरासाठीच्या ५० किलोच्या एक हजार ३५० बॅगा आढळून आल्या आहेत. तसेच गोदामाच्या समोर उभा असणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच०४, जीआर ३००४ मध्ये ५० किलोच्या ४०० बॅगा आढळून आल्या आहेत. यामध्येही आर.सी.एफ, जीएसएफसी, मद्रास फर्टीलायझर, जयकिसान, इफ्को, कृपको आदी कंपन्यांच्या युरियाच्या बॅगांचा समावेश आहे. गोदामामध्ये शेती वापरासाठीच्या दोन हजार ७२९ मोकळ्या बॅगा आढळून आल्या आहेत. या बॅगांवर इंडस्ट्रीज वापरासाठीचा युरिया असा शिक्का आहे. कृषी वापरासाठी असणाऱ्या साठ्यातून तपासणीसाठी चार कंपन्यांचे पॅशदिप फॉस्फेट, जीएसएफसी, मद्रास फर्टीलायझर, आरसीएफ या कंपन्यांच्या खताचे नमुने घेतले आहेत. टेक्निकल ग्रेड युरिया केवळ इंडस्ट्रीजसाठी असतो. या युरियाच्या सीलबंद पोत्यातून तीन नुमने तपासणीसाठी घेतले आहेत. या खताचे सर्व नुमने तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय प्रयोग शाळेकडे पाठविले आहेत. या सर्व युरियाची किंमत ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपये आहे. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा. आटके, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांमध्ये कृषी विभागाने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी