सांगली : वाढती बेरोजगारी, उद्योगांना लागलेली अधोगती आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्किल करून टाकणारा कारभार भाजप सरकारकडून सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी भाजपकडून विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकाविणे, त्यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी दबाव टाकणे, असे प्रकार सुरू आहेत. सीबीआयसह इतर महत्त्वाचे विभाग हाती घेत कारवाईची भीती घालत ‘टॅक्स टेररिझम’चा वापर सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगलीत केला.
आमदार विश्वजित कदम यांची प्रदेश कॉँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, प्रकाश सातपुते, पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले की, गेल्या पाच वर्षात देशविकासाचे काहीही काम न करता भाजपने लोकसभा निवडणुकीत राष्टÑीय सुरक्षा, पाकिस्तानसारख्या भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवत सत्ता मिळविली असली तरी, त्यांना सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण देशभरात भाजपविरोधी वातावरण असतानाही लागलेला निकाल अनपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमवर नव्हे, तर मतपत्रिकेवर घेण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. या निवडणुकाही मतपत्रिकेवर घेतल्या असत्या, तर निश्चितच निकाल वेगळा लागला असता. जनतेला केवळ भूलथापा देण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.
आता तर भाजपने सत्ता मिळविण्यासाठी सीबीआयला नियंत्रणात आणत भाजपमध्ये प्रवेश न करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘टॅक्स टेररिझम’चा वापर करून सत्ता मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील फडणवीस सरकारही सपशेल अपयशी ठरले असून या सरकारने समृध्दी महामार्ग, मुंबईतील एमएमआरडीएच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला असून त्याची किंमत त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागणार आहे. राज्यातील जनतेला ७२ हजार जागांवरील मेगाभरतीचे गाजर दाखवून फडणवीसांनी राजकीय भरती मात्र जोमात सुरू केल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना विश्वजित कदम म्हणाले की, जिल्'ातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील, राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे पोरकेपणाची भावना असली तरी, या नेत्यांच्या प्रेरणेतूनच जिल्हाभर पुन्हा जोमाने काम करत पक्षाची ताकदीने उभारणी करणार आहे. जिल्हा नेतृत्वहीन वाटत असला तरी, मी स्वत:, सत्यजित देशमुख, विशाल पाटील एकत्र येत एकदिलाने काम करत आहोत. राज्यातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज असल्याने या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून त्यांना खाली खेचण्यासाठी कॉँग्रेस जोमाने कामाला लागणार आहे.
कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पी. एन. पाटील, जयश्रीताई पाटील, सत्यजित देशमुख आदींनीही मनोगत व्यक्त केले. आमदार जयकुमार गोरे, निरीक्षक प्रकाश सातपुते, अलका राठोड, शैलजा पाटील, मालन मोहिते, विक्रम सावंत, नामदेवराव मोहिते यांच्यासह जिल्हाभरातून आलेले कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षणपृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपण न केलेल्या कामाची प्रसिध्दी भाजप करत आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता व त्याची अंमलबजावणीही त्यानुसारच झाली असताना, श्रेय लाटले जात आहे. कार्यकर्त्यांनी अशा भूलथापांना बळी न पडता आपण केलेले काम जनतेपर्यंत आणावे.जिल्'ातील कॉँग्रेस एकसंधविश्वजित कदम म्हणाले की, ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाने जिल्'ातील कॉँग्रेस नेतृत्वहीन असल्याचे बोलले जात असले तरी, नवीन फळी तितक्यात ताकदीने काम करत आहे. आजच्या कार्यक्रमाला विशाल पाटील आले नसले तरी, त्यांनी स्वत: मला त्याचे कारण सांगितले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी वेगळा अर्थ काढू नये. जिल्'ातील सर्वांना बरोबर घेऊन सर्व मतदारसंघात कॉँग्रेस ताकदीने निवडणुकीत उतरणार आहे.