जत : जत व संख येथील रिक्त तहसीलदार पदे त्वरित भरावीत, अशी मागणी बसपाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून जत व संख येथे तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जत शहरातील व तालुक्यातील लोकांची गैरसोय होत असून, जनतेला नाहक त्रास सोसावा लागत आहे. जत व संख येथील तहसील कार्यालयांमधील सर्व कामे ठप्प झाली आहेत. तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमध्ये जनतेची कोणतीही कामे होत नाहीत. जत तालुक्याचे आमदार, सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांवर चिखलफेक करण्यातच मग्न आहेत. त्यांना जत शहराच्या व तालुक्यातील जनतेच्या अडचणी व विकासाचे काहीही देणे-घेणे नाही.
लवकरात-लवकर जत व संख येथील रिक्त असलेली तहसीलदार पदांची नेमणूक करावी, अन्यथा बहुजन समाज पार्टीच्यावतीने सोमवार, दि. १३ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा बसपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
070921\2127-img-20210907-wa0054.jpg
जत व संख येथील रिक्त तहसिलदार पदे त्त्वरीत भरावीत: श्रीकांत सोनवणे यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.