कामेरी : येलूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या इटकरे (ता. वाळवा) उपकेंद्रात १०७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
सुरवातीला येलूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन इटकरे येथील ज्येष्ठ नागरिक व ४५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस घ्यावी लागत होती. मात्र ७ एप्रिलपासून इटकरे उपकेंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. गावात ४५ पेक्षा जास्त वय असणारे ११३२ संभाव्य लाभार्थी आहेत, त्यांपैकी १०७५ नागरिकांचे लसीकरण येलूर व इटकरे येथे पूर्ण झाले आहे, अशी माहिती येलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. पाटील यांनी दिली.
सरपंच वैशाली पवार, उपसरपंच संदीप पाटील, ग्रामसेवक संपत साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. धनश्री गोताड, आशा कदम, आर. डी. पाटील, एल. के. पाटील यांनी प्रयत्न केले.