सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त चार तालुक्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन स्थलांतर झाले. जिल्हा परिषद शाळा, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, सामाजिक संस्था, बाजार कट्टे इ. ठिकाणी जनावरे ठेवण्यात आली होती. दिनांक 24 जुलै पासून पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत लसीकरण कार्यक्रम राबिवणेत आला.
चार तालुक्यामध्ये दिनांक 27 जुलै 2021 पासून रोगनिदान शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. आज अखेर २ हजार ५०५ जनावरांवर औषधोपचार तर ५ हजार ७३५ लसिकरण करण्यात आले आहे.पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे दि.29 जुलै रोजी येथील जनावरांच्या रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळचे सहयोगी अधिष्टाता डॉ. धनंजय दिघे, प्रा. कविता मेश्राम, प्रा. सूर्यवंशी, प्रा. रांगणेकर, प्रा.खानविलकर व विद्यार्थी तसेच बी.जि.चितळे ग्रुपचे मकरंद चितळे, अतुल चितळे, डॉ. एच. आर. इंगळे, सी. व्हि. कुलकर्णी (पी.आर.ओ.) व कर्मचारी, डॉ किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकारी डॉ. आर. कदम प.वि.अ. (विस्तार) डॉ. सचिन रहाणे व कर्मचारी हजर होते.सदर पशुधनास चाऱ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, तसेच संबंधित तालुक्याचे तहसीलदार व विविध सेवाभावी संस्था यांनी मदत केली. जनावरांची आरोग्य तपासणी, औषधोपचार व जंतनाशक औषधाचे वाटप करणेत आले.
पशुपालकांना पावसाळ्यातील जनावरांचे आजार व पशुव्यवस्थापन या विषयी प्रा.मेश्राम व प्रा. पाटोदेकर यांनी मार्गदर्शन केले. या पथकामार्फत माळवाडी,भिलवडी,चोपडेवाडी,बुरुंगवाडी, धनगांव व सुखवाडी येथील शेतकऱ्यांच्या पशुधनाची तपासणी व औषधोपचार करणेत आले. कार्यक्रम हा पूरग्रस्त गावामध्ये दिनांक 29 जुलै ते 01 ऑगस्ट पर्यंत राबिवणेत येणार आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषेद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी,पशुसंवर्धन सभापती शिवाजी डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, जिल्हा उपायुक्त श्री धकाते यांचे सहकार्य लाभले.जिल्हृयात मोठी जनावरे ४४, वासरे १३, शेळ्यामेंट्या -१७, कोंबड्या - ४९ हजार ८८८ इतक्या पशुधन व कुक्कुट यांचे नुकसान झालेले आहे.