सांगली : मिरजेतील कुष्ठरोग वसाहतीत महापालिकेने शनिवारी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली.
मेघजीभाई वाडी येथे ४५ रहिवाशांना कोरोनाची लस देण्यात आली. अन्य ५२ रुग्णांचे लसीकरण यापूर्वीच केले होते. दोघांनी लस घेण्यास नकार दिला, तर तीन जण कोरोनातून नुकतेच मुक्त झाले होते. ११ रहिवासी आजारी असल्याने त्यांना लस देण्यात आली नाही. या राहिलेल्या १६ जणांसाठी पुन्हा लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
या वसाहतीत निराधार, कुष्ठरुग्ण मोठ्या संख्येने राहतात. वयोवृद्धांची संख्याही जास्त आहे. काही जणांकडे आधार किंवा अन्य ओळखपत्रे नाहीत. त्यामुळे महापालिकेने स्वत:हून तेथे लसीकरण मोहीम राबवली. उपायुक्त स्मृती पाटील, महापालिकेचे नोडल अधिकारी डाॅ. वैभव पाटील, डॉ. नौसीन कापशीकर, डॉ. मयूर अैांधकर आदींनी मोहीम राबवली.