शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

Valentine Day: संकटांनी दरीत ढकलले, पण जिद्दीने शिखरावर पोहोचवले!; पुण्यातील दिव्यांगांची प्रेरणादायी कहाणी

By अविनाश कोळी | Published: February 14, 2023 12:05 PM

जर्मन बेकरीतील बाॅम्बस्फोटाने युवतीच्या शरीराची चाळण झाली, तर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारपद्धतीने तरुणाला पक्षाघात झाला.

अविनाश कोळीसांगली : जर्मन बेकरीतील बाॅम्बस्फोटाने युवतीच्या शरीराची चाळण झाली, तर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारपद्धतीने तरुणाला पक्षाघात झाला. संकटांच्या दोन वेगळ्या तऱ्हा, पण जगण्याचा लढा, जिंकण्याची जिद्द सारखीच. त्यातून पुण्यातील दोन दिव्यांगांनी प्रेरणादायी कहाणी जन्माला घातली. थक्क करणाऱ्या त्यांच्या या संघर्षाला, त्यातून मिळविलेल्या यशाला व समाजासाठी दिलेल्या योगदानाला सांगलीकरांनी नुकताच सलाम केला.सांगलीच्या अपंग सेवा केंद्राच्या वतीने प्रेरणादायी कहाणी असलेल्या दिव्यांगांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात पुण्यातील आम्रपाली चव्हाण व अनिकेत जगताप या दोन दिव्यांगांच्या कहाणीने साऱ्यांनाच हादरवले, पण त्यांच्या कार्याचा गौरव करतानाच अनेकांना जीवन जगण्याचा मंत्र मिळाला.१३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरीत कॉफीचा घोट घेणाऱ्या आम्रपालीच्या शरीराचा घोट मोठ्या बाॅम्बस्फोटाने घेतला. आज या घटनेला १३ वर्षे पूर्ण झाली. एका तपाचा तिचा संघर्ष म्हणजे जगण्याच्या लढाईचा थरारपटच. बॉम्बच्या छऱ्यांनी शरीराची चाळण केली. सात शस्त्रक्रिया, तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेशिवाय झालेल्या उपचार पद्धतींचा सामना तिला करावा लागला.अनेक वर्षांच्या वैद्यकीय उपचारानंतर ती सावरली. जगण्याची शर्यत जिंकताना समाजातील अन्य घटकांनाही जगण्याचा मंत्र देण्यासाठी ती उभी राहिली. प्रेरणादायी, सकारात्मक भाषणातून तिने अनेकांना जगण्याची ऊर्जा दिली. ‘पीस असोसिएशन’ची स्थापना, ‘वुई पुणेकर’चे सदस्य होऊन तिने समाजकार्यात झोकून दिले.अपंगत्व सोबतीला घेऊन तो धावतोय...पुणे जिल्ह्यातीलच खामगाव (ता. दौंड) येथील अनिकेत जगताप याचीही कहाणी थक्क करणारी. वयाच्या पाचव्या वर्षी ताप आल्यानंतर चुकीचे निदान करून डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनने त्याला पक्षाघात झाला. दोन्ही हात, पाय, मानेच्या हालचाली थांबल्या. हे अपंगत्वाचे जगणे त्याला मान्य नव्हते. त्याला टक्कर देत सामान्य शाळेत शिकत त्याने बी. टेक. केले. आयटी कंपनी स्थापन केली. चाळीसहून अधिक देशांशी तो सध्या व्यवहार करतोय. अनेक लोकांना त्याने रोजगार दिला. कंपनी १०० कोटींवर नेऊन शेकडो तरुणांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न बाळगून त्यामागे तो धावतोय.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे