कडेगाव : माझ्या विजयात भारती विद्यापीठ आणि कदम कुटुंबियांचे बहुमोल योगदान आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांची ताकद माझ्या पाठीशी होती त्यामुळे मी आमदार झालो, अशी कृतज्ञतापूर्ण भावना नूतन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली.
कडेगाव येथे सागरेश्वर सूतगिरणीमध्ये आयोजित सत्कारावेळी आसगावकर बोलत होते. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्याहस्ते आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष महेश कदम तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, सोनहिरा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पोळ उपस्थित होते.
यावेळी आमदार आसगावकर म्हणाले, मुलांना आवश्यक मूलभूत शिक्षण, सुविधा
मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. महाविकास
आघाडी सरकारच्या माध्यमातून
शिक्षण क्षेत्रातील समस्या तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी चिंचणी सोसायटीचे अध्यक्ष विश्वास महाडिक, भारती विद्यापीठाचे सचिन पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : १४ कडेगाव २
ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सूतगिरणीवर शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष महेश कदम, प्रकाश जाधव, लक्ष्मण पोळ आदी उपस्थित होते.