शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

वांगी, वडियेरायबागचे दोन तलाठी निलंबित

By admin | Published: December 09, 2014 10:59 PM

महसूल विभागात खळबळ : वाळू तस्करांवर कारवाई करण्यात कुचराई

वांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी व वडियेरायबाग येथील येरळा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा प्रकरणीच्या कारवाईत कुचराई केल्याने वांगी येथील गावकामगार तलाठी एस. एस. शिरतोडे व वडियेरायबाग येथील गावकामगार तलाठी एस. व्ही. खोत यांना कडेगावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निलंबित केले आहे. आज, सोमवारी दुपारी प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली असून वाळू तस्करही कारवाईच्या भीतीने चांगलेच धास्तावले आहेत.कडेगाव तालुक्यातील वांगी व वडियेरायबाग या परिसरात येरळा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. मात्र या परिसरातील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करीत आहेत. याबाबत मागील वर्षापासून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तलाठी एस. एस. शिरतोडे व एस. व्ही. खोत यांना अवैध वाळू उपसा रोखणे व वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे, तसेच वाळू उपसा झालेल्या जागेचे पंचनामे करून त्याबाबत कारवाई करण्याच्या वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र या दोन्ही तलाठ्यांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे व वाळू तस्करांवर कारवाई करण्यात कुचराई केल्याने येरळा पात्रातून वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाळूची चोरी करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यामुळे वांगी व वडियेरायबाग येथील तलाठ्यांवर उपशाबाबतच्या कारवाईत कुचराई केल्याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईने येरळा नदीकाठावरील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)कडेगाव तालुक्यात यापूर्वी वाळू तस्करांवर वाळू चोरीप्रकरणी किरकोळ दंडात्मक कारवाई होत होती. मात्र, दंडात्मक कारवाईनंतरही तस्कर राजरोसपणे वाळूचोरी करीत होते. महसूल खात्यातील कर्मचारी वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत प्रांताधिकारी कांबळे यांनी तलाठ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे आपणालाही मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागणार, या भीतीमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.