इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथे शनिवारी दि. १२ जून रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक आणि प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांनी दिली.
महाडिक म्हणाले, आमदार पाटील यांच्याहस्ते पेठ परिसरातील १ हजार कुटुंबांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. महाडिक शैक्षणिक संकुलातील व्यंकटेश्वरा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. सांगली जिल्ह्याचे नेते नानासाहेब महाडिक यांच्या तैलचित्राचे अनावरण होईल. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह वाळवा, शिराळा तालुक्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.