शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत नोडल, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्याची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 3:01 PM

corona virus Zp Sangli- सांगली जिल्ह्यात 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींची लसीकरणाची प्रक्रिया दि. 1 एप्रिल 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोना लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना : जितेंद्र डुडीनोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती

सांगली  : सांगली जिल्ह्यात 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींची लसीकरणाची प्रक्रिया दि. 1 एप्रिल 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहेतच. तसेच उपकेंद्राच्या ठिकाणी देखील लसीकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.लसीकरणासाठी क्षेत्रीय स्तरावरील विविध घटकांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून यामध्ये सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल इत्यादींना 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी को-विन वेब पोर्टल वर नोंदणी करणे व त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र स्तरावर लसीकरण करण्यासाठी नियोजन करणे, नागरिकांनी सोबत घेवून जावयाच्या कागदपत्रांबाबत माहिती देणे, ग्रामदक्षता समितीने गावामध्ये लसीकरणाबाबत प्रबोधन करणे आदि जबाबदाऱ्या सोपेविण्यात आल्या आहेत.

विस्तार अधिकारी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, केंद्र चालक-अररङ, ग्राम दक्षता समिती इत्यादींना घरभेटी आयोजित करून पात्र व्यक्तींना नोंदणी व लसीकरणासाठी प्रवृत्त करणे, घंटागाड्याव्दारे लसीकरण मोहिमेबाबत ऑडिओ क्लिपव्दारे संदेश देणे, गावामध्ये दर्शनी भागामध्ये कोविड-19 लसीकण मोहिमेची प्रसिध्दी बॅनर्स, होर्डिंग्जच्या माध्यमातून करणे, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक इत्यादींनी ऑनलाईन माध्यमाचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना लसीकरण करण्यासाठी संदेश देणे आदि विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

गृहभेटी करून पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर पाठविणे, पात्र व्यक्तींना नेमून दिलेला लसीकरणाचा दिवस, ठिकाण, लसीकरणाची प्रक्रिया यांची माहिती देणे, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गृहभेटी देवून मोहिमेसंदर्भात माहिती देवून लसीकरणासाठी प्रवृत्त करणे व लसीकरण केंद्रावर मदत करणे, विस्तार अधिकारी (आरोग्य), आरोग्य सहाय्यक, ए.एन.एम., आशा स्वयंसेविका यांनी मोहिमेसंदर्भात माहिती देवून लसीकरणासाठी प्रवृत्त करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र निहाय लसीकरणाचे नियोजन आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे संनियंत्रण करणे व सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण होईल याची दक्षता घेणे आदि विविध जबाबदाऱ्या नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदSangliसांगली