यावेळी आयाेजित ‘ वन मिनिट शो’ स्पर्धेत टिकली लावणे स्पर्धेत पुष्पा कुंजीरे, पूजा लामदाडे, सुचित्रा शेरबंदे यांनी अनुक्रमे प्रथम. दि्वतीय व तृतीय क्रमांक मिळविला. मेणबत्ती लावणे स्पर्धेत विद्या भोसले. सुप्रिया मिसाळ, वहिदा मुजावर यांनी, तर उखाणे स्पर्धेत अनिता चव्हाण, सुमेधा शिंदे, अपर्णा शेरबंदे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. विजयमाला काळे-गावडे, जगदेवी माशाळकर, अंजली देशपांडे, श्रुती कट्टी यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. प्रणाली रसाळ, शकुंतला माळी, शशिकला पोळ, जयश्री सोनवणे यांना महिला सन्मान पुरस्कार देण्यात आला.
नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा अपर्णा शेरबंदे, उपाध्यक्षा कविता कुंडले, यमुना चिकोडे, संगीता बागणे, मनीषा कुंजीरे, हेमलता पाटील, संगीता खताळ, पिंकू चव्हाण, विद्या भोसले, परशुराम कुंडले, रामलिंग तोडकर, युवराज मगदूम, पुष्पा कुंडले, कमल माळी यांनी संयोजन केले. अपर्णा शेरबंदे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज मगदूम यांनी आभार मानले. संजय कट्टी यांनी प्लास्टिक मुक्ती अभियानाबाबत माहिती दिली.