शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सांगलीत अनोखे आंदोलन, रेल्वे पुलाचे काम रेंगाळले म्हणून घातले वर्षश्राद्ध

By अविनाश कोळी | Published: June 10, 2024 7:10 PM

एका गटाने घातली श्राद्धपूजा; दुसऱ्या गटाने घातले जेवण!

बुधगाव : सांगलीत चिंतामणीनगर येथील रेल्वेमार्गावरील जुना उड्डाणपूल पाडल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. नवीन पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे वर्षभरापासून सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. याप्रश्नी ढिम्म प्रशासनाच्या कारभाराविरोधात सोमवारी वर्षश्राद्धाचे अनोखे आंदोलन पार पडले. एका गटाने भटजी आणून श्राद्धपूजेचे सोपस्कार पार पाडले, तर दुसऱ्या गटाने चक्क श्राद्धाचे जेवणच घातले.दक्षिण-मध्य रेल्वेच्या मिरज ते पुणे या लोहमार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. या अंतर्गतच सांगलीत चिंतामणीनगर येथील नवीन उड्डाणपुलाचे काम मागील वर्षी सुरू केले आहे. सांगली ते विटा फलटण असा राज्यमार्ग इथून जातो. नवीन पुलाचे काम सुरू करण्यासाठी १० जून २०२३ रोजी जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आला. त्यामुळे सांगलीतून तासगाव, विट्याकडे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी सांगलीत जुना बुधगाव रस्ता आणि संजयनगरमार्गे किंवा माधवनगर जकात नाक्यातून कर्नाळ रोड म्हसोबा मार्गे असे पर्यायी मार्ग प्रशासनाने त्यावेळी सुचविले. त्यावेळी मात्र या पर्यायी मार्गांची अवस्था दयनीय होती. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच या पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण, डांबरीकरणाची कामे करणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करूनच रुंदीकरण, डांबरीकरणाची कामे करण्यात आली. काही ठिकाणी आजही ती सुरूच आहेत. यामुळे आधीच वैतागलेल्या वाहनधारक, सामान्यांना प्रशासनाच्या कारभाराचा त्रास आजही सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात सोमवारी सकाळी माधवनगर व्यापारी असोसिएशनच्या पुढाकाराने माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत जुन्या पुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्षश्राद्धाचा विधी पार पाडण्यात आला.यावेळी माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा, माजी आमदार नितीन शिंदे, नीताताई केळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील, योगेश देसाई, माधवनगरच्या सरपंच अंजू तोरो, शेखर तोरो, उदय पाटील, मनजित पाटील, राजू आवटी, नीलेश हिंगमिरे, अण्णा मोने, बुधगावच्या सरपंच वैशाली पाटील, मनोहर पाटील, जयश्री पाटील, संगीता पाटील उपस्थित होते.नागरिक कृती समितीचेही वर्षश्राद्ध आंदोलन झाले. यावेळी जुन्या पुलाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, फुले टाकून, आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर, माजी आमदार नितीन शिंदे, डाॅ. संजय पाटील, प्रा. नंदू चव्हाण, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, बाळासाहेब कलशेट्टी, पृथ्वीराजनाना पाटील, गिरीश शिंगणापूरकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेagitationआंदोलन