ओळी : कवलापूर (ता. मिरज) येथे वीराचार्य पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्घाटन अध्यक्ष शशिकांत राजोबा यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत नियोजनबद्ध वाटचाल केल्यानेच ही संस्था विकासामध्ये अग्रेसर असल्याचे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा संस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी केले.
कवलापूर (ता. मिरज) येथील संस्थेच्या स्ववास्तूचे उद्घाटन राजोबा यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच शुभांगी नलवडे, उपसरपंच सौरभ पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, मंदिर कमिटीचे अध्यक्ष दिलीप मुळे, उत्तम पाटील, राजेश पाटील, रोहित मुळे, संजय मुळे, जान्हवी मुळे उपस्थित होते. शाखा संचालिका आशालता मुळे, शीतल मुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवीन वास्तूमध्ये लॉकर सेवा सुविधेसह मोबाईल कॉम्प्याक्टर व्यवस्थेचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या स्वनिधीतून मुख्यालयासह आठवी शाखा स्ववास्तूत कार्यान्वित होत असून, तीन शाखांसाठी जागा संपादित केल्याचे राजोबा यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. डी. बेले, व्यवस्थापक शीतल मसुटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.