सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद असलेले आठवडी बाजार व थेट घरपोच भाजीपाला मिळत असल्याने दरातही वाढ झाली आहे. अनलॉकनंतर भाजीमंडईला परवानगी मिळाली. भाजीपाल्यांच्या आवकीवर परिणाम झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे वांगी, गवारी आणि टॉमेटोचे दर वाढले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत आठवडी बाजार बंद करण्यात आले. सध्याही हे बाजार बंद आहेत, तर दिलेल्या वेळेत मंडई सुरू आहे. सध्या पावसाळ्यामुळेही भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळेही दर वाढले आहेत.
चौकट
पुन्हा डाळींवरच भिस्त
कोट
दोन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद असल्याने भाजी खरेदीसाठी विक्रेत्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. विक्रेते दारात येऊन माल देत असल्याने दरही जास्त आहेत. त्यामुळे आता डाळींचा वापर वाढवला आहे.
कविता माने, गृहिणी
कोट
दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांची चांगली आवक होते. आठवडी बाजारात दराबाबत घासाघीस करता येते. आता मिळेल त्या दरात भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे नाइलाजाने भाज्यांचा वापर कमी केला आहे.
भारती शिंदे, गृहिणी
चौकट
म्हणून वाढले दर...
कोट
भाजीपाल्यांचे उत्पादन होत असलेल्या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने तोडणीस आलेल्या भाज्या पाण्यात आहेत, त्यामुळे आवक कमी झाली आहे. परिणामी या आठवड्यात दर वाढले आहेत.
सुभाष पाटील, व्यापारी
कोट
उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले नव्हते, त्यामुळे आवक कमी आहे. शिवाय आता पाऊसही सुरू झाल्याने स्थानिक पातळीवरच भाज्यांना मागणी असल्याने दर वाढले आहेत. अजूनही दर वाढतील असा अंदाज आहे.
पांडुरंग नरुटे, भाजीपाला विक्रेते
चाैकट
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
कोट
कोरोना आल्यापासूनच शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मागणी आहे मात्र, माल पुरविताना अडचणी येत आहेत, त्यामुळे दरही अपेक्षित मिळत नाही.
राजू माळी, शेतकरी
कोट
अनेक अडचणींवर मात करून भाजीपाला उत्पादन घेत आहे. मात्र, म्हणावा तसा दर मिळत नाही. सध्या भाज्यांना मागणी असली तरी दरही अपेक्षेप्रमाणे नाहीत. पावसाळ्यात अजून अडचणी येणार आहेत.
रमेश मगदूम,
कोट
भाज्या १ जूनचा दर २१ जूनचा दर
टॉमेटो २० ३०
बटाटे २५ ३०
भेंडी ८० १००
मिरची ४० ६०
दोडका ५० ६०
गवार ८० १२०
वांगी ८० १२०
कोथिंबीर १० २०