शिरटे : बहे (ता. वाळवा) येथे गावामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गावातील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांना गावात विक्रीस बंदी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
गावात कोणीही विनामास्क व विनाकारण बाहेर फिरू नये, तसे आढळल्यास २०० रुपये दंड व गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. व्यायामशाळा, मैदानी खेळ तसेच पोहण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांनी घरपोहोच सेवा देण्यात येणार आहे.
सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमांचे पालन करूया व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व कर्मचारी ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती यांनी केले आहे.