शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

व्यंकाप्पा पत्की यांचा प्रवाह विरोधातील लढा प्रेरणादायी : पी. आर. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:48 AM

कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर माजी आमदार अ‍ॅड. व्यंकाप्पा पत्की यांच्या जयंतीनिमित्त कारखाना अध्यक्ष पी. आर. पाटील, मयुरेश पत्की, विराज शिंदे, ...

कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर माजी आमदार अ‍ॅड. व्यंकाप्पा पत्की यांच्या जयंतीनिमित्त कारखाना अध्यक्ष पी. आर. पाटील, मयुरेश पत्की, विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, अशोक वग्याणी, प्रा. बाळासाहेब मासुले, प्रदीपकुमार पाटील, एल. बी. माळी,माणिक शेळके,विजय मोरे यांनी अभिवादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : ज्येष्ठ विचारवंत, माजी आमदार अ‍ॅड. व्यंकाप्पा पत्की यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी कष्टकरी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे. त्यांची निष्ठा, अभ्यास व प्रवाहाच्या विरोधातील लढा प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर माजी आमदार व्यंकाप्पा पत्की यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात पाटील बोलत होते. सुरुवातीला पत्की यांच्या कारखाना कार्यस्थळावरील अर्ध पुतळ्याचे पाटील यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मयुरेश व्यंकाप्पा पत्की, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, प्रदीपकुमार पाटील, अशोक वग्याणी, प्रा. बाळासाहेब मासुले, संचालक एल. बी. माळी, माणिक शेळके प्रामुख्याने उपस्थित होते.

पी. आर. पाटील म्हणाले, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की हे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मोठी साथ दिली आहे. मंत्री जयंत पाटील हे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत, ते पाहून त्यांना मोठे समाधान झाले असते. पत्की सर हे उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण व प्रभावी होते. यावेळी प्रा. बाळासाहेब मासुले, अशोक वग्याणी, प्रदीपकुमार पाटील यांनीही पत्की यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रारंभी संचालक श्रेणिक कबाडे यांनी स्वागत, संचालक विराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमेश हाके, संपतराव पाटील, दिनकर पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, व्ही. बी. पाटील, प्रेमनाथ कमलाकर, संग्राम चव्हाण,उमेश शेटे, गणेश यादव, सुशील भंडारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अभियंता विजय मोरे यांनी आभार मानले.