इस्लामपूर : उपजिल्हा रुग्णालयात कोविडचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटरची उणीव भासू नये म्हणून शिवसेनेच्या वतीने इस्लामपूर आणि शिराळा येथील रुग्णालयात प्रत्येकी एक व्हेंटिलेटर देण्यात आले.
युवानेते राहुल महाडिक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या हस्ते ते डॉ. नरसिंह देशमुख आणि डॉ. राणोजी शिंदे यांच्याकडे सुपुर्द केले.
आनंदराव पवार यांनी खासदार धैर्यशील माने आणि युवा सेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर ठाकरे यांनी खासदार माने यांना इस्लामपूर आणि शिराळा रुग्णालयात प्रत्येकी एक व्हेंटिलेटर देण्याची सूचना केली होती. पवार यांच्या पाठपुराव्यामुळे माने यांनी आपल्या निधीतून दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले.
यावेळी नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका प्रतिभा शिंदे, नंदकिशोर नीळकंठ, युवराज निकम, अंकुश माने, कपिल ओसवाल, सागर मलगुंडे उपस्थित होते.
फोटो- इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या वतीने राहुल महाडिक, आनंदराव पवार यांच्या हस्ते डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे यांच्याकडे व्हेंटिलेटर सुपुर्द करण्यात आले.