शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नाट्यप्रयोगाची सांगलीच्या दीनानाथ नाट्यगृहात नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:17 PM

सदोष ध्वनीयंत्रणा, चुकलेली रचना, ग्रीन रुम्सची दूरवस्था आणि अन्य अनेक गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहांवर नाट्यप्रयोगांनी धरलेला रुसवा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने दूर झाला आहे. खुर्च्यांच्या डागडुजीपासून ध्वनीयंत्रणेपर्यंतच्या सर्व व्यवस्था दुरुस्त करून या रंगकर्मींनी अखेर पु. ल. देशपांडे यांच्या तुझे आहे तुजपाशी या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला.

ठळक मुद्देनाट्यप्रयोगाची सांगलीच्या दीनानाथ नाट्यगृहात नांदीसामाजिक कार्यकर्त्यांचे बळ : तुझे आहे तुजपाशी नाटकास प्रतिसाद

अविनाश कोळीसांगली : सदोष ध्वनीयंत्रणा, चुकलेली रचना, ग्रीन रुम्सची दूरवस्था आणि अन्य अनेक गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहांवर नाट्यप्रयोगांनी धरलेला रुसवा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने दूर झाला आहे. खुर्च्यांच्या डागडुजीपासून ध्वनीयंत्रणेपर्यंतच्या सर्व व्यवस्था दुरुस्त करून या रंगकर्मींनी अखेर पु. ल. देशपांडे यांच्या तुझे आहे तुजपाशी या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला.प्रसिद्ध मराठी नाट्यअभिनेते, गायक व संगीतकार असलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने तत्कालिन नगरपालिकेने याची उभारणी केली होती. आता महापालिकेच्या ताब्यात हे नाट्यगृह आहे. यापूर्वी या नाट्यगृहावर नुतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या गरजा हे नाट्यगृह पूर्ण करू शकले नाही.

महापालिकेवर या नाट्यगृहाच्या कामातून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर हे नाट्यगृह पाडून बहुउद्देशीय संकुल व आत्याधुनिक नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव काही वर्षापूर्वी सादर झाला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकरांचे पुत्र प्रसिद्ध गायक, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी या गोष्टीस विरोध दर्शविला.

आहे त्याच नाट्यगृहाला अद्ययावत करावे, अशी सूचना त्यांनी मांडली होती. त्यानंतर महापालिकेच्या आजवरच्या कारभाऱ्यांनी कधीच दीनानाथ मंगेशकरांच्या नावचे हे नाट्यस्मारक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या उदासिनतेमुळे नाट्यगृहाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली. लावणीचे प्रयोग, विविध संस्थांच्या वार्षिक सभा, सभांमधील मारामाऱ्या, खुर्च्यांची फेकाफेक अशाच गोष्टींचा अनुभव या नाट्यगृहाने गेली कित्येक वर्ष घेतला.आधीच दुर्लक्षित असलेल्या या नाट्यगृहाची अनेक संस्थांच्या सभांनी वाताहत केली. नाट्यप्रयोग होत नसल्याने अनेक रंगकर्मी महापालिकेवर नाराज होते. केवळ नाराजी व्यक्त करण्यापेक्षा काहीतरी कृतीशील पाऊल उचलायला हवे, ही गोष्ट समजल्यानंतर नटराज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून येथे विनामोबदला राबण्यास सुरुवात केली. खराब झालेल्या खुर्च्या स्वखर्चातून दुरुस्त केल्या.

ध्वनीयंत्रणेचीही डागडुजी केली. ग्रीनरुम्स व अन्य खोल्या व परिसराची त्यांनी कित्येक दिवस स्वच्छता केली. सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून तुझे आहे तुजपाशी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले.

सांगलीकर रसिकांनीही दीनानाथ नाट्यगृहातील या पहिल्या प्रयोगाबद्दल कुतूहल दाखवून गर्दी केली आणि नाट्यप्रयोग यशस्वी झाला. संस्थेचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सुरज वाघमोडे, अविनाश जोशी, स्वप्नील कोळी, विशाखा पाटील, जगन्नाथ साळुंखे, विक्रम खामकर, सचिन ठाणेकर, कुलभूषण काटे, अपेक्षा चव्हाण, रोहन माने यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली