शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

पशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 4:08 PM

Veterinary hospital Sangli- पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.

ठळक मुद्देपशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्यापशुपालकांच्या सोयीसाठी पशुसंवर्धन मंत्रालयाचा निर्णय

सांगली : पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.नव्या निर्णयानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी पशुवैद्यकीय रुग्णालये सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत सलग सुरु राहतील. दुपारी एक ते दिड जेवणाची सुट्टी राहील. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत कामकाज सुरु राहील. आकस्मिक प्रसंगी २४ तास सेवा सुरु राहील असेही स्पष्ट केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व रुग्णालयांसह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांनाही नव्या वेळा लागू राहतील.यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत कामकाज चालायचे. हिवाळ्यात सकाळी ८ ते दुपारी १ आणि त्यानंतर ३ ते सायंकाळी ५ या वेळेत उपचार मिळायचे. मधील वेळेत रुग्णालये बंद असल्याने पशुपालकांची गैरसोय व्हायची. जनावरे घेऊन आलेल्या शेतकर्यांना थांबावे लागायचे.

डॉक्टर व कर्मचारीही दिवसभर अडकून पडायचे. उपचारांव्यतिरिक्त बाहेरील कार्यालयीन कामांना वेळ मिळायचा नाही. आता सलग रुग्णालय सुरु राहिल्याने पशुपालक व डॉक्टरांचीही सोय झाली आहे. कार्यालय व रुग्णालयाची वेळ सुसंगत झाली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली