ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 25 - तमिळनाडूतील जलिकट्टू आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवावी या मागणीसाठी चाकण आणि कराड येथे आंदोलने करण्यात आली होती. आज सांगली येथे बैलगाडी शर्यती सुरू करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पवनचक्कीच्या टॉवरवर चढून एका शेतकऱ्याचे आंदोलन केले आहे. पेटा हटवा, कायदा बदला, बैलगाडी शर्यत चालू करा असा फलक गळ्यात घालून, या शेतकऱ्यांने हे आंदोलन केले आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच, अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
बैलगाडी शर्यत बद्दल थोडक्यात माहिती - - बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो. सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.- खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते. -विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.
https://www.dailymotion.com/video/x844pfc