म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील विद्याधर बाबू कबुरे (वय ८२) यांचे बुधवारी (दि. १४) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष होत.
काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, वसंतदादा सूतगिरणीचे संचालक, लक्ष्मी सहकारी बँकेचे संस्थापक-अध्यक्ष, दिगंबर जैन समाजाचे खजिनदार, अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली होती. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्यासोबतही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. म्हैसाळच्या सामाजिक, राजकीय, संस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.