यावेळी विकास बोरकर म्हणाले की, जे. के. (बापू) जाधव यांचे आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कृष्णाकाठ परिसर हा मला नवीन नाही. जलसिंचनाची सर्व कामे करत असताना या भागाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे माझ्याकडून या परिसरासाठी जे जे करता येईल ते मी निश्चितपणे करेन.
यावेळी शिवाजी जलसिंचन योजनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष भीमराव कदम, वसंतराव नलवडे, तुकाराम जाधव, गणपतराव जाधव, बाळासाहेब नाईक, सचिव किरण आरबुने, अजित जाधव, उत्तम आरबुने, अनिल दळवी, मानसिंग बँकेचे सरव्यवस्थापक संभाजी जाधव, इंजिनिअर रमेश जाधव, विवेक नलवडे, अनिल जाधव, जयंत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १३ दुधाेंडी १
ओळ : आष्टा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल विकास बाेरकर यांचा दुधाेंडी (ता. पलूस) येथे कृष्णाकाठ उद्योग समूहातर्फे जे. के. (बापू) जाधव, युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.