संख : तिकोंडी (ता. जत) येथील काशिबाई बसाप्पा चौधरी यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. यात त्यांचे सात लाखांचे नुकसान झाले. घटनास्थळाची पाहणी करून जळीतग्रस्त कुंंटुबियांना विक्रम फाऊंंडेशनतर्फे आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते धनादेशाद्वारे आर्थिक मदत करण्यात आली.
तिकोंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्ती येथे काशिबाई चौधरी या कुटुंबासहित राहतात. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य, द्राक्ष बागेची औषधे, सोने व चांदीचे दागिने, कडधान्ये जळून खाक झाले. जळीत कुंंटुबियांना विक्रम फाउंडेशनने मदत केली.
यावेळी संख अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब कोडग, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, उपसरपंच बसवराज पाटील, रायाप्पा राचगोंड, बुड्या नदाफ उपस्थित होते.
फोटो ओळ : तिकोंडी (ता. जत) येथील काशिबाई बसाप्पा चौधरी या जळीतग्रस्त कुटुंबाला विक्रम फाऊंंडेशनने आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते आर्थिक मदत देण्यात आली.