अविनाश कोळी
सांगली : राज्याच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या १२ अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास एका संस्थेने केला असून जिल्हानिहाय आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला आहे. यात काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी सर्वाधिक प्रश्न मांडले असून भाजप आमदारांनी सर्वात कमी प्रश्न मांडले आहेत.मुंबईतील संपर्क संस्थेने अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यात अधिवेशनातील आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. विषयनिहाय प्रश्नांचा अभ्यासही यात मांडला आहे. सांगली जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य व शेतीसंदर्भातील प्रश्न सर्वाधिक मांडले. याशिवाय सांगली, कोल्हापूर व सातारा या तिन्ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न सांगली जिल्ह्यातील आमदारांनी मांडल्याचेही दिसून येते.
कोणत्या आमदारांनी किती प्रश्न मांडले
आमदार पक्ष प्रश्नसंख्याअनिल बाबर शिवसेना ६७
जयंत पाटील राष्ट्रवादी (श. प.) २०४मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी (श. प.) २२
सुमन पाटील राष्ट्रवादी (श. प.) १२६सुरेश खाडे भाजप १
विक्रमसिंह सावंत काँग्रेस २१४विश्वजीत कदम काँग्रेस १४१
सुधीर गाडगीळ भाजप ०
जिल्हानिहाय प्रश्नांची टक्केवारी
सांगली ९.०९
कोल्हापूर ७.८९सातारा ६.०१
जिल्ह्यातील आमदारांनी कोणते प्रश्न मांडले
विषय प्रश्नबालक १७
महिला, मुली १९शालेय शिक्षण ३८
आरोग्य ४८अंगणवाडी ९
पोषण १आदिवासी १३
पाणी २९पर्यावरण १३
शेती १६सिंचन ९
रेशन ६वीज १४
मनुष्यबळ २६प्रश्न विचारण्यात काँग्रेस अव्वल
पक्षनिहाय अभ्यास केला तर काँग्रेसच्या दोन आमदारांनी मिळून एकूण ३५५, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी मिळून ३५२, शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी ६७ तर भाजपच्या दोन आमदारांनी मिळून एक प्रश्न विचारला आहे.
राज्यातील प्रश्न अधिक
जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी ८९ टक्के प्रश्न हे राज्याचे होते. जिल्ह्यातील समस्यांविषयी एकूण ५९ प्रश्न विचारले गेले. म्हणजेच जिल्ह्यातील केवळ ११ टक्के प्रश्न उपस्थित केले गेले.
जिल्ह्यातील या प्रश्नांवर टाकला प्रकाशझोतअवकाळी, अतिवृष्टी व गारपीटने झालेले शेतीचे नुकसान
बोगस फायनान्स कंपन्यांकडून फसवणूक,सांगली, मिरजेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर
जत तालुक्यातील वंचित ६४ गावांच्या पाण्याचा प्रश्नअलमट्टीमुळे सांगलीला महापुराचा फटका
दत्त इंडिया साखर कारखान्याकडून नदीचे प्रदूषणबागेवडी (ता. जत) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचार
कोयना धरणातून सांगली जिल्ह्याचे हक्काचे २७.५० टीएमसी पाणी मिळावे