शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 2:16 PM

विविध रंगी खुडेने साकारलेल्या या फलकचित्रावरुन नजरच हटत नाही

गंगाराम पाटीलवारणावती: आपल्या जवळ असणाऱ्या कलेची प्रामाणिकपणे जपणूक आणि साधना करून कलाक्षेत्रात नाव मिळवणारे कलाशिक्षक विलास चौगुले यांचे फलकचित्रे सर्वत्र चर्चेत आहेत. सध्या शिवजंयती निमित्ताने साकारलेले शिवराज्याभिषेकाचे फलकचित्र कलेचा अप्रतिम नमूना ठरत आहे.विलास चौगुले यांनी शिवजयंती दिनी फलकावर साध्या खडूने केलेल्या शिवरायावरील मातृसंस्कार, (बालाशिवाजी), व राज्याभिषेक सोहळा हे फलकचित्र सर्वांचे आकर्षण ठरत आहे. हे चित्र बघणाऱ्यांना विश्वासही बसणार नाही असे हे फलकचित्र आहे. जणू काही एखादे डिजिटल किंवा पेंटच आहे की काय असेच हे फलकचित्र वाटते. विविध रंगी खुडेने साकारलेल्या या फलकचित्रावरुन नजरच हटत नाही.

आरळा ता. शिराळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे विलास चौगुले शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे नित्यनेमाने फलक लेखन करत असतात. या फलक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक संदेश, सुभाषिते, प्रेरणादायी यश मिळवणाऱ्याना शुभेच्छा, जनजागृतीपर संदेश अत्यंत सुबक सुंदर अक्षरात लिहून जनजागृती करीत आहेत.तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजलीच्या फलक लेखनाचा व   बिपिन रावत यांची हुबेहूब प्रतिमा रेखाटली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने रेखाटलेले फलक लेखन व डॉ.  आंबेडकर यांची हुबेहूब काढलेली प्रतिमा  खूप दाद देऊन गेली .या कामी त्यांना शिक्षण संस्थचे चेअरमन आर. व्ही. हसबनीस, अध्यक्ष वैजनाथ महाजन, सचिव बं. चिं. दिगवडेकर,  सर्व संचालक व मुख्याध्यापक आर. एस. हसबनीस, सर्व शिक्षक कर्मचारी यांचे प्रोत्साहन व सहकार्यं लाभत आहे.आपल्या कले विषयी बोलताना विलास चौगुले म्हणाले ,माझे वडील मैदानी खेळ खेळायचे, नाटकामध्ये काम करायचे, मातीच्या छोट्या मोठ्या मूर्ती बनवायचे, अशिक्षित असूनही त्यांच्यात मला कलाकार दिसायचा त्यांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला पाचवीत असताना वडील वारले मात्र त्यांच्यातील कलाकार माझ्या रूपाने जिवंत ठेवायचा निर्धार केला. पुढे शालेय शिक्षण पूर्ण करत कलाविश्व विद्यालयात ए.एम. पदवी मिळवून गेल्या तीस वर्षापासून कला क्षेत्रात कार्यरत आहे.

टॅग्स :SangliसांगलीShivjayantiशिवजयंतीTeacherशिक्षक