विलासराव जगताप भाजपसाठी अदखलपात्र, आमदार विक्रमसिंह सावंतांचे टीकास्त्र

By श्रीनिवास नागे | Published: July 17, 2023 06:12 PM2023-07-17T18:12:56+5:302023-07-17T18:14:13+5:30

सरकार असूनही पाठपुरावा केला नाही

Vilasrao Jagtap is unfit for BJP, criticism of MLA Vikram Singh Sawant | विलासराव जगताप भाजपसाठी अदखलपात्र, आमदार विक्रमसिंह सावंतांचे टीकास्त्र

विलासराव जगताप भाजपसाठी अदखलपात्र, आमदार विक्रमसिंह सावंतांचे टीकास्त्र

googlenewsNext

जत : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेच्या पाण्यातून जत तालुक्यातील सहा ते सात तलाव भरले आहेत. त्यामुळे मी कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केला. जेथून सहज पाणी मिळू शकेल तेथे प्रयत्न सुरू आहेत. मात्र विलासराव जगताप यांनी त्यांचे सरकार असताना कुठल्याच कामासाठी पाठपुरावा केला नाही. मुळातच ते भाजपसाठी अदखलपात्र आहेत, अशी टीका आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.

यंदा तालुक्यात दुष्काळाचे भीषण सावट आहे. शेतकऱ्यांना मदतीची खरी गरज आहे. यासाठी लाक्षणिक उपोषण व रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय याचे राजकीय भांडवल करावे, अशी आमची कोणतीच मनोभावना नाही. जगताप यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी याचेही भांडवल केले. मुळात सरकार त्यांचेच असताना त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पाठपुरावा करणे गरजेचे होते. मात्र आम्ही सरकार नसताना शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या एकच भावनेने कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडे सतत प्रयत्न करतो आहे. कदाचित जतला न्याय न देणाऱ्या लोकांच्या मनात हे खुपत असावे असे वाटते.

सावंत म्हणाले, तालुक्यातील महावितरणची समस्या, कृषी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केली आहे. जलसंपदा विभागाशी संपर्क करून वारंवार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले. याशिवाय विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. जनतेने ही सर्व ओळखले आहे. त्यामुळे आता तुमची नौटंकी थांबवावी.

यावेळी आप्पाराया बिराजदार, सभापती सुजय शिंदे, सरदार पाटील, बाबासाहेब कोडग, अशोक बन्नेनवर, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, बिराप्पा शिंदे, सलीम पाच्छापुरे, परशुराम मोरे, दिलीप सोलापुरे, मारुती पवार, शिवकुमार तंगडी आदी उपस्थित होते.

Web Title: Vilasrao Jagtap is unfit for BJP, criticism of MLA Vikram Singh Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.