शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

Maratha Reservation: हिंगणगादे येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी, सांगली जिल्ह्यातील पहिले गाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 1:58 PM

नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही

दिलीप मोहिते विटा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगणगादे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी रविवारी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलन हाती घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्णय जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्व गावांनी घ्यावा, अशी विनंती जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला केली आहे.या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावातील ग्रामस्थ शंकर (नाना) मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रविवारी एकत्रित आले. त्यावेळी ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला तसेच पुढाऱ्याला गावात येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. त्याचबरोबर कोणी एखादा राजकीय नेता किंवा पुढारी गावात जर आलाच तर त्याचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे, असे समजून त्याच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्याचाही निर्णय ग्रामस्थांनी घेतला.यावेळी शंकर मोहिते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राज्यातील नेते सदाभाऊ खोत, नारायण राणे, रामदास कदम या वाचाळविरांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु आगामी काळात मराठा समाजाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना तसेच पुढाऱ्यांना गावबंदी करणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. यावेळी तरुणांनी 'एकच मिशन.. मराठा आरक्षण' तसेच 'एक मराठा.. लाख मराठा' अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी सरपंच अजितकुमार मोहिते, शंकर मोहिते, जालिंदर मोहिते, परशुराम साळुंखे, विष्णू यादव, महादेव कदम, निलेश निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण