कडेगाव पंचायत समिती कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याबाबत आयोजित बैठकीत जितेंद्र डुडी बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती मंगल क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ग्राम दक्षता समिती व गावांतील सरपंच यांनी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण हे घराबाहेर पडणार नाहीत, तसेच जेथे कंटेन्मेंट झोनमधील लोक नियमांचे पालन करीत आहेत का हे सर्व पाहण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीची व सरपंचांची आहे. त्यांनी प्रभावीपणे काम केले तरच कोरोना हद्दपार होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू केली असून, तेथे ऑक्सिजन बेड व अतिदक्षता बेडची सोय केली आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ऑक्सिजन बेड, तर ७०० अतिदक्षता बेडची सोय केली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी. ग्राम समित्या कार्यक्षमपणे काम करीत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी प्रत्येक तालुक्यात लोकप्रतिनिधी व खातेप्रमुखांचे संयुक्त पथक तयार केले जाणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शांता कनुजे, वैद्यकीय अधिकारी आशिष कालेकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, संतोष गोसावी, मुख्याधिकारी कपिल जगताप, आदी उपस्थित होते.
फोटो : २६ कडेगाव १
ओळ :
कडेगाव पंचायत समितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंगल क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे उपस्थित हाेते.