सांगली : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत. ‘ई-चालान’द्वारे करण्यात येणारा दंड न भरता त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले होते. यासाठी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत १५ दिवसांत ५३ लाख ९६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ई-चालान डिव्हाइसद्वारे दंड करण्यात येतो. ई- चालानाद्वारे करण्यात येणारा दंड न भरणाऱ्यांवरही प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी लोक अदालतीमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.त्यानुसार जिल्ह्यातील ७ हजार २०९ वाहनधारकांकडून ५३ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्या वाहनधारकांनी न्यायालयाची नोटीस येऊनही दंड भरला नाही त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्याची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे वाहनधारकांनी आपला प्रलंबित दंड जवळच्या वाहतूक शाखेत भरावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत दंडाची रक्कम भरणा करण्यासाठी सर्व ठिकाणी विशेष माेहीम राबविण्यात येणार आहे. तरी प्रलंबित दंड तत्काळ भरण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला ५४ लाखांचा दंड
By शरद जाधव | Published: December 21, 2023 3:36 PM