विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी, पळ काढू नये; संजय पाटील यांचं विधान

By अविनाश कोळी | Published: January 2, 2024 08:29 PM2024-01-02T20:29:20+5:302024-01-02T20:29:38+5:30

पक्षांतर्गत कुणी तिकीट मागणे अयोग्य नाही

Vishal Patil should contest the election, not run away; Statement of BJP MP Sanjay Patil | विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी, पळ काढू नये; संजय पाटील यांचं विधान

विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी, पळ काढू नये; संजय पाटील यांचं विधान

सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत समोर कोण असणार याचा विचार कधी केला नाही; पण काँग्रेसचे विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढायला हवी. मैदानातून पळ काढू नये, असे मत भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पाटील यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत काय झाले, यावेळी विरोधात कोणता पक्ष असणार याबाबत आम्ही विचार केला नाही. विशाल पाटील यांनी मात्र, लढायला हवे. भाजप अंतर्गत कुणी तिकिटाची मागणी केली तर त्यातही गैर काही नाही. स्पर्धा असायला हवी. निकोप वातावरण असणे ही गोष्ट चांगली आहे. भाजपने ती गोष्ट जपली आहे.

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत ते म्हणाले, हे काम येत्या मार्चअखेर पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला घालण्यात आली असून, ठेकेदाराने ती मान्य केली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याबाबत लोकांकडून तक्रारी येत असल्याने मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्हालाही हे काम वेळेत पूर्ण होईल, ही अपेक्षा आहे.

Web Title: Vishal Patil should contest the election, not run away; Statement of BJP MP Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.