शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

विश्वजीत कदम बिनविरोध, भाजपासह सर्व उमेदवारांचे अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 7:14 AM

कमालीची उत्कंठा वाढवणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सांगली : कमालीची उत्कंठा वाढवणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याचवेळी विरोधातील सर्व आठ जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. काँग्रेसने पतंगरावांचे पुत्र, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली. विधानसभेच्या निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा कालावधी उरल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना आणि राष्टÑवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने मात्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. देशमुख यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला होता.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कदम यांच्याविरोधात संग्रामसिंह देशमुख यांच्यासह आठ जणांचे अर्ज होते. सोमवारी दुपारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता देशमुख यांच्यासह अपक्षांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख यांनी जाहीर केले.>विश्वजीत झाले भावुकबिनविरोध निवडून आल्याचे समजताच विश्वजित कदम भावूक झाले. त्यांनी चुलते आमदार मोहनराव कदम यांची भेट घेऊन त्यांना मिठी मारली.पतंगराव कदम यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. गुलाल न उधळता आणि फटाके न वाजवता साधेपणाने हा विजय साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.> विश्वजीत कदम यांचा अल्पपरिचयअडतीस वर्षीय विश्वजीत कदम यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी तसेच बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.) घेतली आहे.हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण आणि व्यवस्थापन(एम.एल.ई.) पूर्ण केले आहे. सध्या ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कार्यवाह आहेत. २०१४मध्ये त्यांनी पुण्यातून काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात पराजय पत्करावा लागला होता.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदम